शेतमालास किफायशर बाजारभाव मिळवुन देण्याच्या दृष्टीने बाजार आवारात सुविधा पुरविण्याचे काम बाजार समित्यांना करावे लागते. महाराष्ट्रातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांना प्रशासकीय अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने तसेच बाजार समित्यांचे व पर्यायाने शेतमालाचे नियमन करण्याचे महच्वपुर्ण कामकाज पणन संचालनालयामार्फत राज्यातील बाजार समित्यां विषयीचे कामकाज पाहाते.
बाजार समितीचे अधिकार आणि कर्तव्य
१.बाजार समितीने बाजार क्षेत्रात या अधिनियमान्वये केलेले नियम आणि उपविधी यांच्या तरतुदी अंमलात आणणे, बाजार क्षेत्रात कृषि उत्पन्नाच्या पणनाच्या बाबतीत ( संचालक, राज्य पणन मंडळ, राज्य शासन) वेळोवेळी जे निर्देश देईल असा सुविधांची तरतुद करणे, बाजाराच्या संबंधात अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण याबाबतीत किंवा बाजार श्रेत्रातील कोणत्याही जागी कृषि उत्पन्नाच्या पणनाच्या विनिमयनासाठी आवश्यक असतील अशी कामे करणे
२.बाजारात येणा-या लोकांच्या प्रवेशाचे वागणुकीवर देखरेख ठेवणे आणि वाहनांच्या वाहतुकीचे विनिमयन करणे.
३.लायसन्स देणे, त्याचे नुतनीकरण करणे, ते नाकारणे किंवा रद्द करणे.
४.बाजार क्षेत्रामधील बाजाराची देखभाल करणे व त्याचे व्यवस्थापन करणे व त्यासह बाजारात प्रवेश देणे व बाजारांचा वापर करण्यासंबंधात शर्ती घालणे.
५.बाजार क्षेत्रामधील बाजारात कृषि उत्पन्नाच्या पणनसाठी आवश्यक सोई सुविधा पुरविणे.
६.बाजार समितीचे असलेले अधिनियम व उपविधी मध्ये करण्यात आलेल्या तरतुदी व कार्यपध्दती यांच्या अनुसार अधिसुचित कृषि उत्पन्नाच्या लिलावांचे विनियमन करणे व पर्यवेक्षण करणे.
७. कृषि उत्पन्नाची विक्री त्याचे मोजमाप करणे, ते सुपुर्द करणे, त्यासंबंधात द्यावयाची रक्कम, खरेदी-विक्रीशी संबंधीत इतर बाबी या विहीत पध्दतीने पार पाडणे, त्यांची अम्मलबजावणी करणे
८. कृषि उत्पन्नात भेसळ करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रतवारी व प्रमाणिकरणास चालना देणे
९. शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे.
१०. कृषि उत्पन्नाचे उत्पादन, विक्री, साठवण, त्यावर प्रक्रिया करणे, त्यांच्या किंमती, वाहतुकी संबंधीची माहिती, पिके, त्यांची आकडेवारी, बाजारवृत्त यासंबंधीची माहिती ठेवणे तिचा प्रसार करणे.
११. कृषि उत्पन्नाचे पणन आणि त्याला सहाय्यभूत अशा सर्व बाबींती संबंधीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या संव्यवहारांमधुन उद्भवणा-या विवादांची मिटवणुक करणे. १२. आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता संपादन करणे तिची विल्हेवाट करणे.
१३. कोणताही दावा खटला, वाद, कार्यवाही अर्ज किंवा लवाद दाखल करणे, अथवा तडतोड करणे.
१४. विहित पध्दतीने बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी व्यवस्था करणे.
१५. बाजार समिती ज्या बाबतीत हक्कदार असेल असे आकार फी, पट्ट्या आणि अतर रकमा किंवा पैसे आकारणे, घेणे, वसुल करणे व स्विकारणे.
१६. बाजार क्षेत्रात खरेदी-विक्री विषयक सुविधा पुरविण्यासठी संचालकांच्या मान्यतेने राज्य शासन, केंद्र शासन किंवा विविध वित्तीय संस्था यांच्याकडुन कर्ज, अर्थसहाय्य घेणे. १७. बाजार क्षेत्रात वापरात असलेले तराजु, वजनमापे आणि लायसन्सधारकांचे लेखा पुस्तके व इतर दस्तऐवज यांची पडताळणी करणे.
१८. बाजार क्षेत्रात साठवण व वखारविषयक सुविधा पुरविणं.
बाजार समितीची रचना
राज्य शासन प्रत्येक बाजार क्षेत्रासाठी सभापती, उपसभापती व इतर सदस्य यांची मिळुन बनलेली एक बाजार समिती स्थापन करील. बाजार समितीला अखंड अधिकार परंपरा असते, तिची एक सामान्य मुद्रा असून ज्या प्रयोजनासाठी स्थापना करण्यात आली त्या सर्व
गोष्टी करण्यास सक्षम असते.
१) बाजार समिती संचालक मंडळाची रचना बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ ५ वर्षासाठी असुन कार्यकारी मंडळात बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधी म्हणून ११ सदस्यांची नेमणूक असून कार्यक्षेत्रात असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे नऊ प्रतिनिधी पुरूष व दोन महिला प्रतिनिधी, एक इतर मागासवर्गिय, एक विमुक्त जमाती यातील असून चार प्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या मार्फत येत असून त्यापैकी एक अनुसुचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील व्यक्ती आणि एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती असून दोन प्रतिनिधी अनुज्ञप्तीधारकांमधून व्यापारी प्रतिनिधी व एक तोलणार हमालांचा प्रतिनिधी असून एक प्रतिनिधी बाजार समितीच्या क्षेत्रातील पंचायत समिती यांचा एक प्रतिनिधी स्थानिक प्राधिकारी (महानगर पालिका) यांचा असून एक प्रतिनिधी प्रक्रिया खरेदी-विक्री संस्था असून एक सदस्य शासन नियुक्त व बाजार समितीचे सचिव असे एकुण २१ सदस्यांचे कार्यकारी मंडळ असते. या कार्यकारी मंडळांतील शेतकरी प्रतिनिधींमधून सभापती व उपसभापती निवडण्याची तरतूद असून समितीच्या कामकाजावर सभापतींचे नियंत्रण असते.
२) उपसमित्यांची रचना
बाजार समिती आपल्या असलेल्या सदस्यांपैकी एक ते ५ सदस्यांची मिळुन उपसमित्यां नेमत असुन प्रत्येक उपसमिती तिला नेमुन दिलेले अधिकार आणि कर्तव्य निश्चीत केलेले असतात त्याप्रमाणे नेमण्यात आलेली उपसमिती बाजार समितीचे अधिकार, मार्गदर्शन व नियंत्रणाचे कामकाज करते यामध्ये १ ) सेवक उपसमिती २) अनुज्ञप्ती उपसमिती ३) बांधकाम उपसमिती ४) नियमन उपसमिती ५) प्रतवारी उपसमिती ६) वांधा उपसमिती या उपसमित्यांचा समावेश असतो.
बाजार समितीची स्थापना
नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना दि. २१/११/१९५२ रोजी झाली.
अधिक शोधा